Sanjay Rathod Aurangabad | माजी मंत्री संजय राठोड यांचं औरंगाबादेत जंगी स्वागत
संजय राठोड हे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मी सध्या संभाजीनगरचा दौरा करत आहे. माझ्या समाजातील आणि भटक्या समाजातील बांधवाना भेटत आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्याचा माझा प्रश्न आहे.
संजय राठोड हे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मी सध्या संभाजीनगरचा दौरा करत आहे. माझ्या समाजातील आणि भटक्या समाजातील बांधवाना भेटत आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्याचा माझा प्रश्न आहे. माझ्या मंत्रीपदाबाबद्दल मला काही बोलायचं नाही. याबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील. मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाही, असं राठोड यांनी सांगितलं.
उदय सामंत यांनी माझ्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाबाबत काही विधान केलं आहे. त्यांची प्रतिक्रिया मी ऐकली नाही. ते माझे स्नेही आहेत. ते बोलले. पण त्याबद्दल त्यांनाच अधिक विचारलं पाहिजे. मी काही बोलू शकत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
Latest Videos