गुणरत्न सदावर्ते हे विदूषक अन् मनोरुग्ण, कुणी काढली सदावर्तेंची अक्कल आणि लायकी?
गुणरत्न सदावर्ते म्हणजे विदूषक असल्याची खरमरीत टीका लोकसंग्रामचे अध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे. स्वतः ला डॉन म्हणवून घेण्याची लायकी तरी आहे का? असे म्हणत अनिल गोटे यांनी सदावर्तेंची लायकी काढल्याचे पाहायला मिळाले
धुळे, १४ नोव्हेंबर २०२३ | गुणरत्न सदावर्ते म्हणजे विदूषक असल्याची खरमरीत टीका लोकसंग्रामचे अध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे. स्वतः ला डॉन म्हणवून घेण्याची लायकी तरी आहे का? असे म्हणत अनिल गोटे यांनी सदावर्तेंची लायकी काढल्याचे पाहायला मिळाले. तर ‘अनिल गोटे खूप छोटे आहेत. मोठे नाहीत ते फार छोटे आहे. आणि मी डॉन आहे’, असे म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी अनिल गोटे यांच्यावरती टीका केली होती. दरम्यान यावर प्रत्युत्तर देताना जोरदार टीका केली. मी छोटा माणूस आहे म्हणून मला सबंध महाराष्ट्र ओळखतो. समजदराला समजावून सांगता येतं, मात्र विदुषकाला काय सांगणार असं म्हणत सदावर्ते हे मनोरुग्ण आहेत अशी टीका गोटे यांनी केली आहे. सामाजिक राजकीय क्षेत्रात वावरताना समाज मनाचे भान ठेवत बोलावं लागतं मात्र काहींना कसं बोलावं याची अक्कल नाही असेही ते म्हणाले. दरम्यान अनिल गोटे कोण आहे हे सदावर्ते अजून माहीत नाही असेही ते यावेळी म्हणाले.