राष्ट्रवादीचा बडा नेता अन् माजी आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देणार? शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला आणखी एक धक्का!
VIDEO | शरद पवार यांना आणखी एक मोठा धक्का, बड्या नेत्याची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी? आज पत्रकार परिषद घेऊन नेमकी काय जाहीर करणार भूमिका?
धुळे, ९ ऑगस्ट २०२३ | गेल्या काही दिवसांपुर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 40 आमदारांनी सोडचिठ्ठी दिल्याने राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्याचे समोर आलं. राष्ट्रवादीच्या आमदारांनी केलेल्या या बंडामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसला होता. मात्र आता पुन्हा राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. धुळ्यातील बडा नेता आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करून अनिल गोटे यांनी गेल्या गुरुवारीच राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अनिल गोटे आज पत्रकार परिषद घेऊन या राजीनाम्याची अधिकृत माहिती देणार आहेत. तसेच राजनीमा का दिला याचे कारण सांगणार असून आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मात्र राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन आता ते कोणत्या पक्षात जाणार किंवा त्यांची पुढील भूमिका काय असणार याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.