वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार, सूत्रांची माहिती काय?
वसंत मोरे यांनी राजीनामा दिलेल्या दिवसापासून सुरू आहे. अशातच त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मी वेळ घेऊन सांगेन असे म्हटले होते. इतकंच नाहीतर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छाही व्यक्त केली होती. मात्र आता पुण्यातून वसंत मोरे हे वंचितच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढणार?
मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे नेमके कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची चर्चा वसंत मोरे यांनी राजीनामा दिलेल्या दिवसापासून सुरू आहे. अशातच त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मी वेळ घेऊन सांगेन असे म्हटले होते. इतकंच नाहीतर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छाही व्यक्त केली होती. मात्र आता पुण्यातून वसंत मोरे हे वंचितच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. दरम्यान, वसंत मोरे यांनी मराठा संघटनांचा पाठिंबा मिळणार आणि पुण्यातील लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत होताना पाहायला मिळण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. तर गेल्या दोन दिवसांपूर्वी सकल मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला वसंत मोरेंनी हजेरी लावली होती.