Manoj Jarange Patil : संभाजीराजे यांचा मनोज जरांगे पाटील यांनी ‘तो’ शब्द पाळला अन्…
VIDEO | मनोज जरांगे पाटील हे आज पुन्हा आमरण उपोषणाला बसल्याची माहिती मिळताच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी थेट अंतरवली सराटी येथे आंदोलनस्थळी धाव घेतली. यावेळी छत्रपती घराण्याचा वशंज म्हणून संभाजीराजे यांनी मनोज जरांगे पाटील यांना एक विनंती केली.
जालना, २५ ऑक्टोबर २०२३ | आमरण उपोषण सुरू ठेवा पण पाणी घ्या, अशी विनंती छत्रपती संभाजीराजे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केली. यानंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले, संभाजीराजे यांचा शब्द मोडणार नाही. आजच्या दिवशी पाणी घेऊन आजचं उपोषण करतो. संभाजीराजे यांच्या शब्दाचा मान ठेवून पाणी घेतलं. तर समाजासाठी झटणाऱ्या माणसाच्या मागे उभं राहिला पाहिजे असं संभाजीराजे यांनी म्हटलं. मनोज जरांगे पाटील यांच्याशी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करून झाल्यानंतर संभाजीराजे भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. तर छत्रपतीच्या घरातील व्यक्ती म्हणून थोडं सांगण्याचा अधिकार आहे. तुम्ही उपोषण करा पण पाणी घेऊन करा. माझी हात जोडून विनंती आहे. असं संभाजीराजे म्हणाले. यासह तुम्ही तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या, असा आपुलकीचा सल्लाही संभाजीराजे यांनी दिला. यावेळी त्याचा कंठ दाटून आल्याचे पाहायला मिळाले.