आज जे मोर्चे काढतायेत त्यांचे थोबाडं का बंद आहेत; मिटकरी यांचा घणाघात

आज जे मोर्चे काढतायेत त्यांचे थोबाडं का बंद आहेत; मिटकरी यांचा घणाघात

| Updated on: Apr 01, 2023 | 9:04 AM

संयोगिताराजे छत्रपती वेदोक्त मंत्रांवरून रोखण्यात आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सरकारवर घणाघात केला. तसेच आज जे मोर्चे काढतायेत त्यांचे थोबाडं का बंद आहेत असा सवाल केला आहे

अकोला : माजी खासदार संभाजी छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून रोखण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा प्रकार ऐतिहासिक काळाराम मंदिरातच प्रकार घडला. त्यानंतर याप्रकरणावरून सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात टीका होताना दिसत आहे. याच प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सरकारवर घणाघात केला. तसेच आज जे मोर्चे काढतायेत त्यांचे थोबाडं का बंद आहेत असा सवाल केली आहे. तर छत्रपतीच्या गादीच्या वारसदारांना जर कमी लेखत असाल तर महाराष्ट्र सहन करणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. त्याचबरोबर छत्रपतींच्या गादीचा अपमान करणाऱ्या महंतांन विरुद्ध गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Published on: Apr 01, 2023 07:15 AM