शरद पवार यांनीच खरा देशद्रोह केला अन् काँग्रेस फोडण्याचं कामही... गंभीर आरोप कुणाचा?

शरद पवार यांनीच खरा देशद्रोह केला अन् काँग्रेस फोडण्याचं कामही… गंभीर आरोप कुणाचा?

| Updated on: Nov 09, 2022 | 11:12 AM

खरं तर काँग्रेस फोडण्याचे काम शरद पवारांनी केलं... त्यामुळे गद्दार कोण? हे शरद पवारांनी लक्षात ठेवावं... अशी खोचक माजी खासदारांनी केली आहे...

महेश सावंत, सिंधुदुर्गः महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक (Sudhakar Naik) यांनी माफीया विरुद्ध जोरदार मोहीम हाती घेतल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्रात दंगल घडवून सुधाकर नाईक यांना मंत्रिपदावरून हटवले… हा खरा तो देशद्रोह आहे, असा आरोप माजी खासदार सुधीर सावंत (Sudhir Sawant) यांनी केलाय. सिंधुदुर्गमध्ये ते बोलत होते. सावंत म्हणाले, ‘ देश द्रोह करण्याचं पाप शरद पवार यांनी केलं आहे… हे अगदी रेकॉर्डवर आहे…. व्होरा कमिटीचा जो अहवाल आलाय त्यामध्ये यात याचा उल्लेख आहे… हा खरा देशद्रोह शरद पवार करत .. आणि नको ती बेताल वक्तव्य करून “सरकार पडणार, सरकार पडणार” असे बोलत आहेत. खरं तर काँग्रेस फोडण्याचे काम शरद पवारांनी केलं… त्यामुळे गद्दार कोण? हे शरद पवारांनी लक्षात ठेवावं… अशी खोचक माजी खासदार सुधीर सावंत यांनी केली आहे…

Published on: Nov 09, 2022 11:09 AM