Special Report | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग 48 तासांत समोर येणार?
परमबीर सिंह यांच्या प्रकरणांचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी पुनीत बाली यांनी केली आहे. सीबीआयकडे या प्रकरणांचा तपास गेला तर ते कोणत्याही क्षणी समोर येतील, असं सिंह यांच्या वकिलांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाकडून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे. मुंबई पोलीस आणि सीबीआयनं परमबीर सिंह यांना 6 डिसेंबरपर्यंत अटक करु नये, असे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टात परमबीर सिंह यांचे वकील पुनीत बाली यांनी ते भारतात आहेत. या प्रकरणांचा तपास सीबीआयकडे दिल्यास ते 48 तासात समोर येतील, असं बाली म्हणाले. परमबीर सिंह यांच्या प्रकरणांचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी पुनीत बाली यांनी केली आहे. सीबीआयकडे या प्रकरणांचा तपास गेला तर ते कोणत्याही क्षणी समोर येतील, असं सिंह यांच्या वकिलांनी म्हटलं आहे.
Latest Videos