ठरलं... विधानसभा लढवणार, माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंचा पक्ष अन् मतदारसंघ ठरला

ठरलं… विधानसभा लढवणार, माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंचा पक्ष अन् मतदारसंघ ठरला

| Updated on: Aug 19, 2024 | 2:58 PM

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे देखील विधानसभा निवडणुरीच्या रिंगणात दिसणार आहे. बघा काय केली संजय पांडे यांनी मोठी घोषणा?

गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना निवडणूक लढवायची होती, मात्र संधी मिळाली नाही. मात्र आता स्वतः ते निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे संजय पांडे यांनी प्रचाराला सुरुवात केली असून ते कोणत्या पक्षातून आणि कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याचीही माहिती दिली आहे. तर आता संजय पांडे यांनी नाशिकमध्ये असताना मोठी घोषणा केली आहे. संजय पांडे हे राष्ट्रीय जनहित पक्षाच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. इतकंच नाहीतर स्वत: नाशिकमध्ये संजय पांडे यांनी चार उमेदवारांची घोषणाही केली. तसेच त्यांनी मी स्वत: मुंबईतून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे सांगितले. “विधानसभा निवडणुकीसाठी माझी समविचारी पक्षांबरोबर जाण्याबाबत चर्चा सुरु आहे. याबद्दलचा निर्णय लवकरच जाहीर करेल. तसेच महाराष्ट्रातील उर्वरित जागांवर उमेदवारी देण्याबद्दलही चाचणी सुरु आहे. त्याबद्दल लवकरच घोषणा करणार आहे”, असेही संजय पांडे म्हणाले.

Published on: Aug 19, 2024 02:58 PM