नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, माजी पोलीस आयुक्तांचा कुणाशी होणार सामना?
आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी म्हटले असून मला राजकारणात यायची आधीपासून इच्छा होती, असं वक्तव्य करत त्यांनी आपली भावना व्यक्त केली. आगामी विधानसभा निवडणूक मी मुंबईत लढवण्याचं ठरवलं होतं, असंही त्यांनी म्हटलंय.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विधानसभा लढणार असल्याची माहिती समोर येत आहे. आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी म्हटले असून मला राजकारणात यायची आधीपासून इच्छा होती, असं वक्तव्य करत त्यांनी आपली भावना व्यक्त केली. आगामी विधानसभा निवडणूक मी मुंबईत लढवण्याचं ठरवलं होतं. ही निवडणूक लढवण्याचा निर्णय आताचा नाहीतर फार पूर्वीपासूनच मी ठरवलं होतं. मला राजकारणात यायची इच्छा आहे, असे संजय पांडे म्हणाले तर गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी निवडणूक लढवण्याचे ठरवले होते. पण त्यावेळी संधी मिळाली नाही. पण आता जागा देखील निश्चित केली आहे. वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचेही संजय पांडे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय जनहित या नावाच्या पक्षाची स्थापना करून निवडून लढवणार असल्याची माहिती देत १५ ऑगस्टनंतर आम्ही आमचे उमेदवार जाहीर करणार, आमची विचारधारा धर्मनिरपेक्ष असेल, तर कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांशी भविष्यात आमची आघाडी होऊ शकते, असेही संजय पांडे म्हणाले.