राज्यातील अवकाळीच्या नुकसानीवरून सरकारला घेरलं, राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यानं केली जहरी टीका
VIDEO | राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल गोटे यांनी अवकाळीमध्ये शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीवरुन सरकारसह राज्यकर्त्यांवर विखारी टीका
नंदुरबार : राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल गोटे यांनी अवकाळीमध्ये शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीवरुन सरकारसह राज्यकर्त्यांवर विखारी टीका केली आहे. राज्यकर्ते हे निच, नालायक, हलकट आणि स्वार्थी असून नुसते बोलतात. त्यांना अजिबात शेतकऱ्यांची जाण नाही. माल लगाओ आणि माल कमाओ हा फक्त त्यांचा धंदा असल्याचे सांगत हे हलटक राज्यकर्ते पुन्हा सत्तेत येतील, असं वाटत नाही, असं टीकास्त्र गोटे यांनी सोडलं. धुळे, नंदुरबार जिल्ह्यात अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. असे असताना शासनाकडून कवडीची मदत झाली नसल्याने त्यांनी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले आहे. यासह राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. यावरही अनिल गोटे यांनी प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. या यात्रेत राहुल गांधी यांना उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला. राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे महत्त्व वाढले. त्यांना मोदी पप्पू म्हणतात. मात्र स्वतः मोदी पप्पू आहेत, असं म्हणत गोटे यांनी भाजपवर टीका केली.