पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना जेल, काय आहे तोषखाना प्रकरण? जाणून घ्या सविस्तर
VIDEO | इम्रान खान यांना महागडे गिफ्ट भोवले, पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांसंबंधित तोषखाना प्रकरण नेमकं आहे तरी काय?
मुंबई, ६ ऑगस्ट २०२३ | पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तोषखाना केस म्हणजेच भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तीन वर्षाकरता तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इस्लामाबादमधील एका न्यायालयाने त्याला सरकारी भेटवस्तू विकून कमावलेले पैसे जाहीर न केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. मात्र तोषखाना प्रकरण नेमकं आहे तरी काय? तर लोकप्रतिनिधींना मिळालेल्या भेटवस्तू जिथं जमा होतात, त्या विभागाला पाकिस्तानात तोषखाना असे म्हटले जाते. १९७४ मध्ये पाकिस्तान सरकारने या तोषखाना विभागाची स्थापना केली होती. पंतप्रधान हे देशाचे असल्याने त्यांना मिळालेल्या भेटवस्तू नियमाप्रमाणे तोषखानामध्ये जमा कराव्या लागतात. इम्रान खान २०१८ साली पंतप्रधान झाले, मात्र त्यांनी मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती त्यांनी दिली नाही आणि जर तशी माहिती दिली तर इतर देशांच्या संबंधांवर त्याता परिणाम होईल, असे इम्रान खान यांनी सांगितले. मात्र याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर ४ भेटवस्तू विकल्याची इम्रान खान यांनी कबुली दिली.