माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्येत बिघडली, पुण्यात रूग्णालयात दाखल
गेल्या काही दिवसांपासून प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती बरी नसल्याची माहिती मिळतेय, काल बुधवारी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबीयांनी पुण्यातील रुग्णालयात उपचारांसाठी त्यांना दाखल केले आहे. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू
मुंबई, १४ मार्च २०२४ : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये प्रतिभाताई पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती असलेल्या प्रतिभाताई पाटील यांचं वय सध्या ८९ वर्ष आहे. २००७ ते २०१२ या दरम्यान त्यांनी राष्ट्रपतीपद भूषविलं आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती बरी नसल्याची माहिती मिळतेय, काल बुधवारी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबीयांनी पुण्यातील रुग्णालयात उपचारांसाठी त्यांना दाखल केले आहे. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. कायदेतज्ज्ञ प्रतिभाताई पाटील या जळगाव विधानसभा मतदार संघातून निवडून आल्या होत्या. नंतर त्या एस.टी. महामंडळाच्या अध्यक्षा झाल्या. पहिल्यांदाच मंत्री आणि त्यानंतर सतत २० वर्षे त्यांनी निरनिराळ्या खात्याची मंत्रीपदे सांभाळली आहेत.