Samadhan Sarvankar : ‘वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव…’, सरवणकरांचा अमित ठाकरेंना खोचक टोला
‘गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचे काय?’, असा सवाल करत शिवसेनेकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासंदर्भात समाधान सरवणकर काय म्हणाले बघा?
एकनाथ शिंदे यांच्या शिवेसनेचे माजी नगरसेवक सदा सरवणकर यांच्याकडून शिवसेना भवनासमोर भलं मोठं बॅनर लावण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते. शिवसेनेच्या या बॅनरबाजीनंतर मनसे चांगलेच आक्रमक झाले आणि महापालिकेकडून हे बॅनर खाली उतरवण्यात आले. ‘हा क्षण अभिमानाचा, हा क्षण गौरवाचा हा क्षण हिंदू एकजुटीचा हर हर गंगे, नमामी गंगे… गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचे काय?’ असा आशय या बॅनरवर लिहिला असून मनसेला टोला लगावला होता. दरम्यान, या बॅनरबाजीनंतर मनसे आणि शिवसेना यांच्यात वाद झाला. यासर्व पार्श्वभूमीवर सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मनसे नेते संतोष धुरी यांनी वडिलांचं कर्तृत्व आहे पण मुलाचं काय? असा सवाल केला होता, यासंदर्भात बोलताना समाधान सरवणकर म्हणाले, ‘वडिलांचं कर्तृत्व हे मुलासोबत असायलाच हवे, ते जर असेल तर मुलगा पुढे जातो. मी जेव्हा नगरसेवक झालो, तेव्हा माझ्या वडिलांचे कर्तृत्व होते. त्यांचं काम होतं म्हणून मला जनतेने निवडून दिलं.’ पुढे ते असेही म्हणाले की, पण जर वडिलांचं कर्तृत्व नसेल तर निवडणुकीत कसा पराजय होतो? हे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं आहे, असं म्हणत सदा सरवणकर यांनी अमित ठाकरे आणि राज ठाकरे यांना डिवचल्याचे पाहायला मिळाले.

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?

हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला

'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार

पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
