ठाकरे गटाच्या माजी नगसेवकावर हल्ला, गोळीबाराच्या थराराचा Exclusive व्हिडीओ tv9 च्या हाती

ठाकरे गटाच्या माजी नगसेवकावर हल्ला, गोळीबाराच्या थराराचा Exclusive व्हिडीओ tv9 च्या हाती

| Updated on: Feb 08, 2024 | 10:18 PM

दहीसरमध्ये माजी नगरसेवकाच्या गोळीबाराचा थरारक व्हिडीओ टीव्ही ९ मराठीच्या हाती लागला आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिसभाई नावाच्या व्यक्तीने गोळीबार केला. या गोळीबाराचा थरार कॅमेऱ्यात कैद

मुंबई, ८ फेब्रुवारी २०२४ : कल्याणमधील भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण ताजं असताना आता दहिसरमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. दहीसरमध्ये माजी नगरसेवकाच्या गोळीबाराचा थरारक व्हिडीओ टीव्ही ९ मराठीच्या हाती लागला आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिसभाई नावाच्या व्यक्तीने गोळीबार केला. या गोळीबाराचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गोळीबाराची घटना जसीच्या तशी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्हिडीओत अभिषेक घोसाळकर हे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत होते. त्यांचं बोलणं संपवून ते उठून जात असताना त्यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला आहे. मॉरीस भाई आणि अभिषेक घोसाळकर फेसबुक लाईव्ह करतात. हे लाईव्ह सुरू असतानाच हा प्रकार झाल्याचे पाहायला मिळत आहे. ही दृश्य कदाचित तुम्हाला विचलित करू शकतात.

Published on: Feb 08, 2024 10:06 PM