थेट सॅटेलाइटद्वारे EVM नियंत्रित करतात, ठाकरे गटाच्या नेत्यानं कुणावर केला खळबळजनक आरोप?
VIDEO | ईव्हीएम नको बॅलेट पेपर हवा, ठाकरे गटाच्या नेत्यानं गंभीर आरोप करत केली मागणी, बघा कुणावर काय केला आरोप?
गडचिरोली : देशात मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीन सॅटेलाइटद्वारे नियंत्रित केल्या जातात, त्यामुळेच ते एवढे खात्रीशीर दावे करू शकतात, महाराष्ट्रात 48 जागा जिंकून आणू, असा दावा भाजपचे नेते अमित शाह हे कोणत्या आधारावर करत आहेत. त्यांच्या या दाव्यामागे नक्की काहीतरी षडयंत्र आहे, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. यासह चंद्रकांत खैरे यांनी ईव्हीएम मशीन नको तर बॅलेट पेपर हवा, अशी प्रमुख मागणीही केली. छत्रपती संभाजीनगर मधील माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा शिवगर्जना यात्रेतील दौरा गडचिरोलीत आयोजित करण्यात आला आहे. त्यावेळी चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील जनता त्रस्त आहे. शिवसेना फोडण्याचं नीच काम मिंधे गटाने केलं आहे. फडणवीसांनी त्यांना स्ट्राँग केलंय. विकासाचं काम नाही, हेच सांगायला आम्ही इथे आलो आहोत, असेही त्यांनी म्हटले.