‘मविआ’चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली? फक्त घोषणा बाकी?
वंचित आघाडीची महाविकास आघाडी आणखी दोन दिवस वाट पाहणार असल्याचे कळतेय. ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आपले उमेदवार घोषित केले आहे. मविआची शनिवारी जागा वाटपावर अंतिम बैठक झाली
मुंबई, १९ मार्च २०२४ : महाविकास आघाडीचा फॉर्म्युला निश्चित झाला असून आता घोषणा बाकी आहे. वंचित आघाडीची महाविकास आघाडी आणखी दोन दिवस वाट पाहणार असल्याचे कळतेय. ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आपले उमेदवार घोषित केले आहे. मविआची शनिवारी जागा वाटपावर अंतिम बैठक झाली. याच बैठकीत फॉर्म्युला आणि एक-दोन जागांचा वाद सोडला तर जागा वाटपही पूर्ण झालंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गट २२ जागांवर लढणार आहे. तर काँग्रेस १६ आणि पवार यांची राष्ट्रवादी १० जागांवर आपले उमेदवार देणार आहेत. ठाकरे गटाकडून सुरूवातीपासूनच २२ जागांवर दावा होता. त्यानुसार, ठाकरे गटाला २२ जागा मिळतील याची दाट शक्यता आहे. तर ठाकरे गटाने २२ उमेदवार निश्चित केले असून फक्त घोषणाच बाकी असल्याचे सांगितले जात आहे. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट…
Published on: Mar 19, 2024 12:00 PM
Latest Videos