बोरीवलीत चार मजली इमारत कोसळल्याचा व्हिडीओ समोर

बोरीवलीत चार मजली इमारत कोसळल्याचा व्हिडीओ समोर

| Updated on: Aug 19, 2022 | 3:25 PM

मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील साईबाबा नगरमध्ये चार मजली इमारत कोसळली. सुदैवाने, ही इमारत रिकामी होती आणि त्यामुळे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील साईबाबा नगरमध्ये चार मजली इमारत कोसळली. सुदैवाने, ही इमारत रिकामी होती आणि त्यामुळे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे का, याचा शोध अग्निशमन दलाचे जवान घेत आहेत. बोरिवली पश्चिमेतील साईबाबा नगरमधील साईबाबा मंदिराजवळील गीतांजली इमारत दुपारी 12.30 च्या सुमारास कोसळली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबई अग्निशमन दलाच्या किमान आठ गाड्या, दोन रेस्क्यू व्हॅन आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही इमारत मोडकळीस आली असून ती रिकामी करण्यात आली आहे.