नोकरीचे आमिष दाखवत ‘विद्येच्या माहेरघरात’च विद्यार्थ्यांना लाखोंचा गंडा, काय घडला प्रकार?
VIDEO | ३००० विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक, पुण्यात उच्चशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांची प्लेसमेंटच्या नावाखाली होतेय लूट
पुणे : विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात शिक्षण आणि नोकरीसाठी अनेक जण येत असतात. मात्र इथेच काही कंपन्या बेरोजगार विद्यार्थ्यांची फसवणूक करत असल्याचे प्रकार उघड होत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांकडून मोठ्या पगाराच्या नोकरीच्या आमिशापोटी दीड-दीड लाख उकळायचे आणि नोकरी देताना कमी पगाराची नोकरी किंवा नोकरीच द्यायची नाही असे वर्तन करायचे प्रकार सुरु आहेत. एक दोन नाही तर जवळपास ३००० विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा पुण्यात केला जात आहेत. या गरिब विद्यार्थ्यांचे पैसे पोलिसांनी कारवाई करत परत मिळवून द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. पुण्यात उच्चशिक्षित असलेल्या बेरोजगार विद्यार्थ्यांची फसवणूक होत असून जवळपास ३००० विद्यार्थ्यांना लाखो रुपयांना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मोठ्या पगाराचे आमिष दाखवून लाखो रुपयांची वसुली करून प्लेसमेंटच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक होत असल्याने बंडगार्डन पोलिसांमध्ये विद्यार्थ्यांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.