Narayan Rane Live | मी गॅंगस्टार होतो तर मुख्यमंत्री कसं केलं ? नारायण राणेंचा सवाल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत वादग्रस्त विधानानंतर नारायण राणेंना अटक करण्यात आली होती. आता जामीन दिल्यानंतर राणेंनी आज पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं विचारली
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड कोर्टाने जामीन दिल्यानंतर राणेंनी आज पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तीन महत्त्वाचे प्रश्न विचारले. तसंच यावेळी बोलताना ते म्हणाले,
मी गँगस्टर होतो, तर मग मुख्यमंत्री कसे केले?, शिवसेनेत सगळेच मंत्री गँगस्टर आहेत का?, असा थेट सवाल नारायण राणेंनी शिवसेनेला विचारलाय. सामनाच्या अग्रलेखातून राणेंवर आगपाखड करत राणे एखाद्या छपरी गँगस्टारसारखेच वागत-बोलत असल्याची टीका करण्यात आली होती. त्यालाच आता राणेंनी सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. मी जर गँगस्टर होतो, तर शिवसेनेनं मला मंत्री का केलं?, मग शिवसेनेच मंत्री हे गँगस्टर आहेत काय?, असा सवालही राणेंनी विचारलाय.
Published on: Aug 25, 2021 05:39 PM
Latest Videos