Gadchiroli : विरोधी पक्षनेते अजित पवार विदर्भ दौऱ्यावर, गडचिरोलीत अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान, 10 लाख हेक्टर जमीन बाधित

Gadchiroli : विरोधी पक्षनेते अजित पवार विदर्भ दौऱ्यावर, गडचिरोलीत अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान, 10 लाख हेक्टर जमीन बाधित

| Updated on: Jul 28, 2022 | 10:01 AM

धान शेतीसाठीचे मुख्य दोन महिनेच अतिवृष्टी झाल्याने नंतर पिक घेऊनही फार उपयोग होणार नाही. सरकारने लवकरात लवकर जमिनींचे पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. 

गडचिरोलीः  मागील दोन महिन्यांपासून विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं (Vidarbha Farmers) मोठं नुकसान झालं आहे. शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे कर्ज घेतल्यानंतरही शेतकऱ्यांच्या हाती पिक येणार नाही. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दौरे सुरु केले आहेत. आज गडचिरोलीतील (Gadchiroli) ग्रामीण भागात त्यांनी प्रत्यक्ष दौरा केला. शेतकऱ्यांची विचारपूस केली. त्यांच्या नेमक्या काय अडचणी आहेत, ते समजून घेतले. पेरणी करण्याच्या वेळेतच अतिवृष्टी झाल्याने यंदा पिक घेताच येणार नाहीत, अशी स्थिती असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. धान शेतीसाठीचे मुख्य दोन महिनेच अतिवृष्टी झाल्याने नंतर पिक घेऊनही फार उपयोग होणार नाही. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर येथील जमिनींचे पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी अजित पवार यांच्याकडे केली.

 

 

Published on: Jul 28, 2022 10:01 AM