Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganesh Chaturthi 2023 | बाप्पाच्या विसर्जनाला जाताय? जरा जपून! पाण्यात बुडण्याची भिती नाही तर....; BMC चं आवाहन काय?

Ganesh Chaturthi 2023 | बाप्पाच्या विसर्जनाला जाताय? जरा जपून! पाण्यात बुडण्याची भिती नाही तर….; BMC चं आवाहन काय?

| Updated on: Sep 25, 2023 | 3:48 PM

VIDEO | गणेश विसर्जनाच्या वेळी मुंबईतील चौपाट्यांवर येणाऱ्या भक्तांना सतर्क राहण्याचा मुंबई महानगरपालिकेकडून इशारा, स्ट्रिंग रे अन् जेलीफिशच्या दंशाची भीती असल्याने मुंबई पालिकेमार्फत भाविकांना काळजी घेण्यासंदर्भात आवाहन

मुंबई, २२ सप्टेंबर २०२३ | लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी लाखो भाविक मुंबईतील चौपाट्यांवर एकत्र येत असतात. मात्र गणेश विसर्जनाच्या वेळी मुंबईतील चौपाट्यांवर येणाऱ्या भक्तांना सतर्क राहण्याचा इशारा मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आला आहे. मुंबईतील चौपाट्यांवर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात स्टिंग रे आणि जेली फिशचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे त्यांच्या दंशाची भीती असल्याने मुंबई पालिकेमार्फत भाविकांना काळजी घेण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये मुंबई किनारपट्टीवर ‘ब्लू बटन जेलीफिश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीचा वावर अधिक दिसून येत असल्याने यावर आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती मत्स्य व्यवसाय विभागाने बृहन्मुंबई महानगरपालिकेला केली होती.त्यामुळे मुंबईकर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्राधान्य देतानाच ‘जेली फिश दंश’ किंवा ‘स्टिंग रे’ दंश केल्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

Published on: Sep 22, 2023 01:18 PM