Ganesh Chaturthi 2023 | मुख्यमंत्री 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या बाप्पाचं घेतलं दर्शन; भेटीत काय झाली चर्चा?

Ganesh Chaturthi 2023 | मुख्यमंत्री ‘शिवतीर्थ’वर, राज ठाकरे यांच्या बाप्पाचं घेतलं दर्शन; भेटीत काय झाली चर्चा?

| Updated on: Sep 25, 2023 | 3:49 PM

VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर येथील 'शिवतीर्थ' या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या श्री गणरायाचे मनोभावे घेतले दर्शन

मुंबई, २० सप्टेंबर २०२३ | राज्यभरात गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर येथील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जाऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतल्याचे फोटे समोर आले आहे. यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला राज ठाकरे, त्यांचे सुपुत्र अमित राज ठाकरे, मनसे नेते नितीन सरदेसाई तसेच ठाकरे कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या घरातील बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, राज ठाकरे यांच्यासोबत कोणत्याही राजकीय विषयांवर चर्चा झाली नाही, राजकीय दृष्टीनं हे दर्शन न पाहिलं तर बरं होईल, असे म्हणत शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तर राज्यात चांगला पाऊस होऊ दे आणि बळीराजाचं संकट दूर होऊ दे, असे मागणं मागत गणपती बाप्पा महाराष्ट्रावरचं संकट दूर करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Published on: Sep 20, 2023 05:33 PM