Bhakar Jadhav यांच्या घरी बाप्पाचं आगमन, आरतीदरम्यान ढोलकी वादनात भास्कर जाधव झाले दंग
VIDEO | सर्वसामान्यांप्रमाणे राजकीय मंडळींकडे देखील बाप्पा विराजमान, भास्कर जाधव यांनी आरतीच्या वेळी ढोलकीचा धरला ठेका, सहकुटुंब सहपरिवार भास्कर जाधव यांनी जल्लोषात केली बाप्पाची आरती, बघा व्हिडीओ
रत्नागिरी, १९ सप्टेंबर २०२३ | मुंबईसह राज्यात आजपासून सुरू झालेला गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जात आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे कलाकार आणि राजकीय वर्तुळातील मंडळींच्या घरी देखील बाप्पांचे आगमन झाले आहे. बाप्पाच्या या उत्सवात तल्लीन आणि दंग होऊन जाण्यात राजकीय क्षेत्रातील नेतेही काही कमी नाही. भास्कर जाधव यांच्या कोकणातील चिपळूण तालुक्यातील तुरंबव गावात गणेशोत्सव साजरा केला जातो. भास्कर जाधव गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या गावी गेले असता त्यांच्या घरातील बाप्पाच्या आरतीच्या वेळी ढोलकी वादनात भास्कर जाधव दंग झाल्याचे पाहायला मिळाले. आज गणेश चतुर्थीनिमित्त भास्कर जाधव यांच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाले. यावेळी त्यांच्या गणपतीची पूजा झाल्यानंतर गणपतीची आरती करण्यात आली. आरतीसाठी भास्करराव जाधव यांनी आरती संपेपर्यंत ढोलकी वाजवली तर भास्कर जाधव आणि परिवार गणपती बाप्पाच्या आरतीत तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले.