Ganesh Chaturthi 2023 | दीड दिवसांच्या बाप्पाला आज निरोप, विसर्जनासाठी कशी आहे पालिकेची व्यवस्था?

Ganesh Chaturthi 2023 | दीड दिवसांच्या बाप्पाला आज निरोप, विसर्जनासाठी कशी आहे पालिकेची व्यवस्था?

| Updated on: Sep 20, 2023 | 4:01 PM

VIDEO | मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावरील चौपाट्यांवर मुंबई पालिकेकडून आणि पोलिसांकडून जय्यत तयारी केली आहे. बघा व्हिडीओ नेमकी कशी आहे, मुंबईतील गणपती विसर्जनासाठी पालिका प्रशासनाकडून व्यवस्था?

मुंबई, २० सप्टेंबर २०२३ | मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत आहे. मंगळवारी घराघरात लाडक्या बाप्पांचे आगमन झाले असून आज गणेशोत्सवाचा दुसरा दिवस आहे. तर आज दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे. दरम्यान, दीड दिवसांच्या गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी आणि त्यांना निरोप देण्यासाठी दीड दिवसांच्या गणपतीचे आज विसर्जन होत आहे. त्यासाठी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावरील चौपाट्यांवर पालिकेकडून आणि पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर दरवर्षीप्रमाणे पोलीस नियंत्रण कक्ष तसेच मुंबई महापालिकेतर्फे उभारण्यात येणारे मंडप उभारण्यात येत आहेत. आज सकाळपासून काही अंशी दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन सुरु झाले आहे. याकरता तशी व्यवस्था मुंबईच्या चौपाट्यांवर करण्यात आली आहे. गणपतीच्या विसर्जनासाठी मुंबई पालिका प्रशासनाकडून कशी आहे व्यवस्था, बघा व्हिडीओ…

Published on: Sep 20, 2023 04:01 PM