Ganesh Chaturthi 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार लालबागच्या राज्याच्या चरणी लीन, बघा व्हिडीओ

Ganesh Chaturthi 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार लालबागच्या राज्याच्या चरणी लीन, बघा व्हिडीओ

| Updated on: Sep 27, 2023 | 11:56 AM

VIDEO | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मुंबईच्या लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अजित पवार यांच्यासोबत त्यांचे पुत्र पार्थ पवार आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह इतर नेते मंडळीदेखील हजर होते.

मुंबई, २७ सप्टेंबर २०२३ | मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सध्या सुरू आहे. आज गणेशोत्सावाचा नववा दिवस असून उद्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे. अशातच मुंबईतील लालबागच्या राज्याच्या दर्शनाला भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील अभिनेते, कलाकार मंडळी, उद्योगपती यांनी दर्शन घेतल्यानंतर राजकीय मंडळी देखील लालबागच्या चरणी लीन होताना दिसत आहेत. दरम्यान, आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईच्या लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी अजित पवार यांच्यासोबत त्यांचे पुत्र पार्थ पवार आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह इतर नेते मंडळी, पदाधिकारी उपस्थित होते. अजित पवार हे आज मुंबईतील काही मंडळाच्या बाप्पांना भेट देऊन त्यांचे दर्शन घेणार आहे. ज्या प्रमाणे अजित पवार हे आपल्या कामाची सुरूवात मुंबईतील मंत्रालयातून करतात. त्याप्रमाणेच अजित पवार यांनी आज मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागच्या राज्याचं दर्शन घेत त्यांनी या बाप्पांच्या दर्शनाला सुरूवात केली.

Published on: Sep 27, 2023 11:56 AM