Devendra Fadnavis हे दरवर्षीप्रमाणे यंदाही tv9 च्या बाप्पाच्या दर्शनाला, सरकारबद्दल काय केलं भाष्य?

Devendra Fadnavis हे दरवर्षीप्रमाणे यंदाही tv9 च्या बाप्पाच्या दर्शनाला, सरकारबद्दल काय केलं भाष्य?

| Updated on: Sep 22, 2023 | 3:40 PM

VIDEO | सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही ९ मराठीच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. राजकीय दृष्ट्या गणपती बाप्पाकडे काय मागितलं मागणं?

मुंबई, २२ सप्टेंबर २०२३ | देशभरासह राज्यात गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. तर दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही टीव्ही ९ मराठीच्या ऑफिसमध्ये देखील लाडक्या बाप्पाचे आगमन झाले असून संपूर्ण टीव्ही ९ मराठीच्या न्यूज रूममध्ये एकच उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही ९ मराठीच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणपती बाप्पाकडे प्रार्थना केल्याचे पाहायला मिळाले. राज्यात अनेक राजकीय घडमोडी घडत असताना शिंदे-फडणवीस सरकार कायम राहवं, याबद्दल देवेंद्र फडणवीस असे म्हटले की, ‘बाप्पाकडे कोणती गोष्ट मागण्याची गरज नसते. त्या बाप्पाच्या आशीर्वादाने मिळतात आणि मनात त्याबद्दलचा विश्वास असावा लागतो. तो माझ्या मनात आहे.’

पुढे ते असेही म्हणाले, बाप्पा हा विघ्नहर्ता आहे. कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरूवात ही बाप्पापासून होते. कोणतेही कार्य निर्विघ्न पार पडावं, यासठी बाप्पाची आराधना केली जाते. त्यामुळे गणपती बाप्पाकडे एकच मागणी आहे की, देशासह राज्यावर सातत्याने येणारी विघ्न दूर करण्याची शक्ती बाप्पानं द्यावी.

Published on: Sep 22, 2023 03:36 PM