Ganesh Chaturthi 2023 | राज ठाकरे मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया येथे बाप्पाच्या दर्शनाला, बघा व्हिडीओ

Ganesh Chaturthi 2023 | राज ठाकरे मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया येथे बाप्पाच्या दर्शनाला, बघा व्हिडीओ

| Updated on: Sep 19, 2023 | 10:00 PM

VIDEO | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या बाप्पाचे घेतले दर्शन, बघा या दोघांच्या भेटीचा व्हिडीओ....

मुंबई, १९ सप्टेंबर २०२३ | राज्यभरात आज घरोघरी बाप्पाचं आगमन झाले आहे. विशेष म्हणजे राज्यातील मोठे नेते, कलाकार मंडळींपासून उद्योगपतींच्या घरीदेखील बाप्पा विराजमान झाले आहेत. अशातच आज देशाचे प्रसिद्ध आणि श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कुटुंबासह दाखल होत त्यांनी त्यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि मुकेश अंबानी यांच्या याच भेटीचा फोटो सध्या सोशल मिडीयावर समोर आला आहे. मुंकेश अंबानी यांच्या अँटीलिया या निवासस्थानी राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे हे देखील अंबानींच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला आज गेले होते. यावेळी गणपती बाप्पाच्या आगमनाच्या निमित्ताने मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे.

Published on: Sep 19, 2023 10:00 PM