Ganesh Chaturthi 2023 : रात्री १२ वाजेपासून लालबागच्या राजाचे मुखदर्शन होणार बंद, तर चरण स्पर्शाची रांगही बंद; पण का?
VIDEO | मुंबईतील लालबागच्या राज्याचं दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी, आज रात्री १२ वाजेपासून लालबागच्या राजाचे मुखदर्शन बंद होणार, तर लालबागच्या राज्याच्या चरण स्पर्शाची रांगही मुख्य प्रवेशद्वारापासून बंद करण्यात आली आहे. काय आहे कारण?
मुंबई, २७ सप्टेंबर २०२३ | मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाची धूम सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आज गणेशोत्सावाचा नववा दिवस असून उद्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे. अशातच मुंबईतील लालबागच्या राज्याच्या दर्शनाला भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. अवघा एक दिवस शिल्लक असल्याने गणेश भक्तांची चांगलीच मांदियाळी लालबागच्या राजाच्या चरणी आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसह अभिनेते, कलाकार मंडळी, उद्योगपती आणि राजकीय मंडळी देखील लालबागच्या चरणी लीन होताना दिसत आहेत. मात्र याच गणेश भक्तांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आज रात्री १२ वाजेपासून लालबागच्या राजाचे मुखदर्शन बंद होणार आहे. तर मुख्य प्रवेशद्वारापासून असलेली लालबागच्या राजाच्या चरण स्पर्शाची रांगही आज सकाळपासून बंद करण्यात आली आहे.