Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganesh Naik Case Victim : गणेश नाईक प्रकरणातील पीडिता NCP च्या वाटेवर, चाकणकरांची घेतली भेट

Ganesh Naik Case Victim : गणेश नाईक प्रकरणातील पीडिता NCP च्या वाटेवर, चाकणकरांची घेतली भेट

| Updated on: Apr 29, 2022 | 8:20 PM

दीपा चौहान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केलीय. काल त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षा प्राजक्ता मोडकर यांना पत्र लिहून आपल्याला पक्षात काम करण्याची संधी मिळावी अशी विनंती केली आहे.

नवी मुंबई : भाजप नेते आणि ऐरोलीचे आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर दीपा चौहान या महिलेने लैंगिक अत्याचारासारखा गंभीर आरोप केलाय. नाईक यांच्यासोबत मी पूर्व संबंधात होते. त्या संबंधातून मुल झाल्यानंतर त्यांनी माझ्यावर अनेकवेळा जबरदस्ती केली, माझं लैंगिक शोषण झालं, असा आरोप चौहान यांनी केला आहे. गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी कोर्टात अर्जही सादर केलाय. दरम्यान, नाईक यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या दीपा चौहान (Deepa Chauhan) या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय. त्याबाबत त्यांनी एक पत्र लिहून पक्षाला तशी विनंतीही केली आहे. त्याबाबत खुद्द दीपा चौहान यांना विचारलं असता ‘मला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष पहिल्यापासूनच आवडतो. महिला आयोगाने (Women Commission) माझी मदत केली आहे. मला राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करायचा आहे. तसं पत्रही मी दिलं आहे, अशी माहिती दीपा चौहान यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय.