Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची... पहा लालबागच्या राजाची आरती

Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची… पहा लालबागच्या राजाची आरती

| Updated on: Sep 16, 2024 | 4:55 PM

सोमवारी सकाळी ६ वाजल्यापासून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची रांग बंद करण्यात आलीये तर मध्यरात्री १२ वाजल्यापासून मुखदर्शनही बंद होणार आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या तयारीबरोबरच विसर्जनाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी दर्शनासाठीच्या रांगा बंद करण्यात आल्या आहेत.

गणेशोत्सवाचा अंतिम टप्पा जवळ आल्याने विसर्जनाच्या तयारीला वेग आला आहे. गणेशोत्सवादरम्यान लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये केवळ मुंबईकरच नाही तर देशभरातील भाविक सहभागी झालेत. विशेष म्हणजे, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी व्हीव्हीआयपी आणि सेलिब्रिटींची मोठी फौज पाहायला मिळतेय, त्यामुळे सर्वसामान्य भाविकांना राजाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगेत उभे राहून काहिशी प्रतिक्षा करावी लागतेय. अशातच सोमवारी सकाळी ६ वाजल्यापासून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची रांग बंद करण्यात आली असून मध्यरात्री १२ वाजल्यापासून मुखदर्शन रांग बंद होणार आहे. विसर्जनाच्या तयारीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवरांनीही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. बघा याच लालबागच्या  राजाची आरती….

Published on: Sep 16, 2024 04:55 PM