मुंबई : गणेशोत्सवाला अजून 10 दिवस अजून बाकी आहेत. 19 सप्टेंबरला गणेशचतुर्थी आहे. त्यानंतर मुंबईसह संपूर्ण राज्यात 10 दिवस गणेशोत्सवाची धूम असेल. गणेशोत्सवाला अजून काही दिवस बाकी असले, तरी मुंबईत गणेशोत्सव आताच सुरु झालय असं वाटतय. आज चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा आहे. मुर्तीकार रेश्मा खातू यांच्या कार्यशाळेतून चिंचपोकळी चिंतामणीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. दरवर्षी संपूर्ण मुंबईतून मोठ्या संख्येने भाविक चिंचपोकळी चिंतामणीच्या आगमन सोहळ्याला येतात. यावर्षी सुद्धा चिंचपोकळी चिंतामणीच्या आगमन सोहळ्याला अशीच अलोट गर्दी झाली आहे. खासकरुन तरुणाई मोठ्या संख्येने आली आहे. मुंबईत ठिकठिकाणहून युवा वर्ग इथे आला आहे. पुणेरी ढोल-ताशाच्या गजरात तरुणाईची पावलं थिरकत आहेत. यंदा मंडळाला 104 वर्ष पूर्ण झाली आहेत. मुंबईत हे प्रसिद्ध गणेश मंडळ आहे.