Ratnagiri | गणेशोत्सवासाठी दाखल झालेले 12 चाकरमानी पॉझिटिव्ह

Ratnagiri | गणेशोत्सवासाठी दाखल झालेले 12 चाकरमानी पॉझिटिव्ह

| Updated on: Sep 12, 2021 | 10:23 AM

रत्नागिरीतील गुहागर तालुक्यात गणेशोत्सवासाठी दाखल झालेले चाकरमानी कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. 12 चाकरमान्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे धोका वाढला आहे. हे सर्वजण गुहागर तालुक्यातील असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये यांनी स्पष्ट केले.

रत्नागिरीतील गुहागर तालुक्यात गणेशोत्सवासाठी दाखल झालेले चाकरमानी कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. 12 चाकरमान्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे धोका वाढला आहे. हे सर्वजण गुहागर तालुक्यातील असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये यांनी स्पष्ट केले. यंदा तर जिल्ह्यात 1 लाख 916 चाकरमानी दाखल झाले आहेत. जे चाकरमानी कोरोनाची टेस्ट न करता आले आहेत त्यांची आरोग्य पथकाकडून तपासणी सुरु आहे.

गणेशोत्सवामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल झाले आहेत. गतवर्षी सगळ्यांची सरसकट कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र त्यामुळे यंत्रणेवर मोठा ताण आला होता. मात्र यंदा जिल्हा प्रशासनाने त्यात बदल केला असून ज्यांना कोरोना सदृश लक्षणे दिसून येतात त्यांचीच आर्टिपीसीआर किंवा अँटी जेन चाचणी करणार येत आहे. त्यातील पहिला अहवाल आज जिल्हा आरोग्य विभागाने प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये आज शनिवारी चाचणी केलेल्या 2561 जणांच्या अहवाल प्राप्त झाला असून त्यातील 12 जणांचा अँटीजेन चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्वजण गुहागर तालुक्यातील आहेत. यातील 11 जणांना गृह विलगिकरण मध्ये तर एकाला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. अद्याप 9405 जणांचे अहवाल प्रगतीपथावर आहेत असे डॉ आठल्ये यांनी सांगितले.