Ganesh Utsav 2024 : लाडक्या बाप्पाला काय नैवेद्य द्यावा, तुम्हाला प्रश्न पडलाय? इथे मिळेल छप्पन भोग
येत्या ७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला सुरूवात होत आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविक आपल्या लाडक्या बाप्पाची मोठ्या थाटामाटात प्राणप्रतिष्ठा कऱणार आहेत. यानंतर प्रत्येक दिवशी बाप्पाला काय नैवेद्य द्यावा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. गणपती बाप्पाचा मोदक हा सर्वात आवडता पदार्थ आहे. याच तुम्हाला वैविध्य हवं असेल तर तुमच्याकडे आता पर्याय उपलब्ध असणार आहे
गणेशोत्सवाला अवघे काही तास शिल्लक आहेत. अशातच घरोघरी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. यासाठी सर्वच जणांची लगबग सुरू आहे. गणेशोत्सवात आपल्या बाप्पाला नवनवीन पदार्थांचा नैवेद्य द्यावे, असे प्रत्येकाची मनोमन भावना असते. यासाठी अस्सल मराठमोळ्या चवीचे स्वादिष्ट पदार्थ आणि मिठाईंच्या दुकांचा शोध घेतला जातो किंवा काही जण ठराविक एकाच दुकानातून दरवर्षी आपल्या बाप्पासाठी मोदक नेत असतात. मुंबईतील एक स्वादिष्ट मोदक मिळण्याचे ठिकाण म्हणजे मुंबई लाडू सम्राट. गेल्या काही दशकांपासून या दुकानातून ग्राहक आपल्या बाप्पासाठी मोदक आवर्जून नेत असतात. त्यामुळे तुम्ही देखील यंदा बाप्पांसाठी छप्पन भोगाचा नैवद्य या दुकानातून नेऊ शकतात. येथे मिठाईमध्ये लाडू सम्राट स्पेशल बुंदीचे लाडू, गुलाबजाम, श्रीखंड, आम्रखंड, पेढे चवीत अव्वल आहेत. त्यामुळे तुम्ही आपल्या घरच्या बाप्पाला छप्पन भोगाचा नैवद्य नक्की दाखवू शकतात.