Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या चरणी भरघोस रक्कम, पहिल्याच दिवशी किती दान?
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी ६ वाजेपासून भाविकांना लालबागच्या राजाचं दर्शन खुलं करण्यात आलं. पहिल्या दिवसापासून भाविकांनी राजाचं रूपडं पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती नुसती गर्दीच नाहीतर पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी भरभरून दान केलं. त्याची मोजदाद केली जात आहे.
दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक कोट्यावधीचं दान करत असतात. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी गणेशभक्तांनी लालबागच्या राजाला विशेष दान अर्पण केल्याचे पाहिला मिळाले. या देणगीमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोन्या-चांदीच्या दागिन्यांचाही समावेश आहे. मिळालेल्या देणग्यांचा योग्य विनियोग व्हावा यासाठी गणेशोत्सवाच्या आयोजकांकडून आता या देणगी स्वरूपात मिळालेलं दान मोजण्यात येत आहे. लालबागच्या राजाला अर्पण केलेल्या देणग्या मोजण्यासाठी महाराष्ट्र बँक आणि जीएस महानगर बँकेचे कर्मचाऱ्यांना बोलवण्यात येते. या देणगीची रक्कम आणि दागिन्यांची मोजणी पूर्ण होताच गणेशभक्तांच्या सेवा आणि सामाजिक कार्यात त्याचा उपयोग करण्यात येतो. या देणगीचा वापर लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे विविध सामाजिक कार्यात केला जातो. गणेशोत्सवादरम्यान लालबागच्या राजाला मिळालेल्या दानाचे महत्त्व केवळ धार्मिकच नाही तर सामाजिकही असून, त्याचा योग्य वापर व्हावा यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. मंडळाकडून लवकरच पहिल्या दिवशी भाविकांकडून आलेलं दान जाहीर करण्यात येणार आहे.