Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाल्मिक कराडला नेमकं कोणी चोपलं? बीडच्या सेंट्रल जेलमध्ये तुफान राडा, घडलं काय?

वाल्मिक कराडला नेमकं कोणी चोपलं? बीडच्या सेंट्रल जेलमध्ये तुफान राडा, घडलं काय?

| Updated on: Apr 01, 2025 | 10:17 AM

बीडच्या सेन्ट्रल जेलमध्ये बबन गिते गँग आणि वाल्मिक कराड गँगमध्ये अक्षरशः राडा झाला. जेलमध्ये महादेव गिते आणि अक्षय आठवलेनं कराड आणि सुदर्शन घुलेला चोप दिलाय. नेमकं काय घडलंय पाहात आहोत.

बीडच्या सेन्ट्रल जेलमध्ये वाल्मिक कराड आणि बबन गिते गँगचं टोळी युद्ध झाल्याची एकच चर्चा झाली. बीडच्या सेन्ट्रल जेलमध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला चोपलं. बबन गिते समर्थक महादेव गिते आणि अक्षय आठवलेकडून मारहाण करण्यात आल्याचा सुरेश धसांनी दावा केला. गिते गँगला हर्सूल जेलमध्ये हलवलं. तर वाल्किम कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारलं असल्याचा महादेव गितेने आरोप केला. संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मास्टरमाईंड वाल्मिक कराड आणि गँग प्रमुख सुदर्शन घुलेला जेलमध्येच मारहाण झाल्याचा दावा धसांनी केलाय.

नाश्त्याची वेळ असल्याने सुदर्शन घुले बारकच्या बाहेर आला. घुलेला पाहून महादेव गिते, अक्षय आठवलेने घुलेला मारहाण केली. यावेळी महादेव गिते आणि आठवलेची घुलेसोबत हातापाय झाली. घुलेला मारहाण होत असल्याचं पाहून वाल्मिक कराड तिथे आला. नंतर महादेव गिते आणि अक्षय आठवलेनं कराडकडे मोर्चा वळवला. कराडच्या अंगावर धावून जात गिते आणि आठवलेनं कराडला मारलं. दरम्यान मारहाणीच्या घटनेनंतर गिते गँगला बीडच्या सेन्ट्रल जेलमधून हर्सूलच्या जेलमध्ये हलवण्यात आलाय. यावेळी महादेव गितेनं वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झाली आणि मारहाण करून आम्हालाच इथून हलवलं जातंय. तसच सीसीटीव्ही फुटेज तपासावं अशी मागणीही केली आहे.

Published on: Apr 01, 2025 10:17 AM