गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची हत्या, कुठं घडली धक्कादायक घटना
VIDEO | अंडरवर्ल्डशी संबंध समोर आल्यानंतर घडली धक्कादायक घटना, गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची कुणी केली हत्या?
प्रयागराज : उमेश पाल हत्याकांडातील आरोपी गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. अतीक आणि अशरफ या दोघांना मेडिकलसाठी पोलीस गाडीतून नेलं जात असताना दोघांवर गोळीबार झाला. या गोळीबारात अतीक आणि अशरफ दोघांचा मृत्यू झाला आहे. या भयानक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती देखील मिळत आहे. संबंधित घटना समोर आल्यानंतर संपूर्ण उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे. तीन लोकांनी अतिक आणि अशरफ या दोन्ही भावांवर गोळीबार केला. या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांकडून वेगाने तपास सुरु करण्यात आला आहे. प्रयागराजच्या मेडिकल कॉलेजजवळ दोघांची हत्या करण्यात आली असून आतापर्यंत तीन मारेकऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.
Published on: Apr 16, 2023 07:00 AM
Latest Videos