पुण्यात दिवसाढवळ्या धाड…धाड, गँगस्टर शरद मोहोळवर तीन गोळ्या झाडल्या; पुणेकर हादरले
कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडल्या. गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर काही अज्ञात हल्लाखोरांनी दिवसा-ढवळ्या गोळीबार केला. या घटनेमुळे पुणेकर चांगलेच हादरले आहेत. शरद मोहोळवर तीन गोळ्या झाडल्या आहेत. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुणे, ५ जानेवारी २०२४ : पुण्यातील कोथरुड परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला. पुण्यातील उच्चभ्रू रहिवाशांचा परिसर असलेल्या कोथरूड परिसरात हा गोळीबार झाला. कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडल्या. गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर काही अज्ञात हल्लाखोरांनी दिवसा-ढवळ्या गोळीबार केला. या घटनेमुळे पुणेकर चांगलेच हादरले आहेत. शरद मोहोळवर तीन गोळ्या झाडल्या आहेत. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोथरूडमधील सुतारदरा परिसरात ही घटना घडली. मात्र या गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. शरद मोहोळ याच्यावर लागोपाठ तीन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील एक गोळी त्याच्या खांद्याला लागल्याची माहिती मिळतेय. त्यानंतर लगेच शरद मोहोळ याला नजकीच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरुन आरोपी फरार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चौकशी सुरू करण्यात आली आहे.