Sharad Mohol : भल्याभल्यांचा थरकाप उडवणाऱ्या शरद मोहोळची हत्या; भरदिवसा गोळ्या घातल्या
कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर काही अज्ञात हल्लाखोरांनी दिवसा-ढवळ्या गोळीबार केला. शरद मोहोळवर तीन गोळ्या झाडल्या यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला
पुणे, ५ जानेवारी २०२४ : पुण्यातील कोथरूड परिसरात आज गोळीबार झाला. कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर काही अज्ञात हल्लाखोरांनी दिवसा-ढवळ्या गोळीबार केला. शरद मोहोळवर तीन गोळ्या झाडल्या यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. शरद मोहोळवरील गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु गँगवार प्रकरणातून हा गोळीबार झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या शरद मोहोळ याचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. शरद मोहोळ याचा आज लग्नाचा वाढदिवस असल्याची माहिती समोर येत असून त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. पुण्यातील उच्चभ्रू रहिवाशांचा परिसर असलेल्या कोथरूड सुतारदरा या परिसरात हा गोळीबार झाला. या घटनेमुळे पुणेकर चांगलेच हादरले आहेत. पोलिसांकडून या प्रकरणी चौकशी सुरु असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लेखोरांची माहिती घेतली जात आहे.

पुणे प्रकरणात गावकऱ्यांकडून मिळाली मोठी माहिती, ‘आरोपी आला अन्..’

'... नाहीतर कपडे फाडून घरी पाठवू', राणेंनी काढली वडेट्टीवारांची लायकी

संजय शिरसाट यांची सिडको बस स्थानकात पाहाणी; कर्मचाऱ्यांना धरले धारेवर

डॉगस्कॉड अन् ड्रोन! बलात्कार करणाऱ्या आरोपीचा पकडण्यास पोलिसांचा शोध
