Sharad Mohol | मुळशीतील सरपंचाचं अपहरण... अतिरेक्याचा गेम... कोण होता गँगस्टर शरद मोहोळ?

Sharad Mohol | मुळशीतील सरपंचाचं अपहरण… अतिरेक्याचा गेम… कोण होता गँगस्टर शरद मोहोळ?

| Updated on: Jan 05, 2024 | 5:38 PM

पुण्यातील उच्चभ्रू रहिवाशांचा परिसर असलेल्या कोथरूड सुतारदरा या परिसरात शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यात आला. पुणे येथील कुख्यात गुंड अशी शरद मोहोळ याची ओळख आहे. शरद मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे अनेक गुन्हे दाखल आहेत.

पुणे, ५ जानेवारी २०२४ : पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. शरद मोहोळ याच्यावर गोळी झाडल्यानंतर त्याला पुण्याच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र सुरू असलेल्या उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पुण्यातील उच्चभ्रू रहिवाशांचा परिसर असलेल्या कोथरूड सुतारदरा या परिसरात शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यात आला. पुणे येथील कुख्यात गुंड अशी शरद मोहोळ याची ओळख आहे. शरद मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे अनेक गुन्हे दाखल आहेत. शरद मोहोळ आणि साथीदारांनी टोळीयुद्धातून गणेश मारणे टोळीतील पिंटू मारणे याचा खून केला होता. या खून प्रकरणात त्याला अटक झाली होती. या खटल्यात जामीन त्याला मिळाला. त्यानंतर दासवे येथील सरपंच शंकर धिंडले यांचे त्याने अपहरण केल्या प्रकरणात त्याला पुन्हा अटक करण्यात आली होती. येरवडा कारागृहात असताना कतील सिद्दीकीचा त्याने खून केला होता. या खटल्यातून त्यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यानंतरही त्याची गुन्हेगारी कृत्य सुरुच होती. यामुळे जुलै २०२२ मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार केले होते.

Published on: Jan 05, 2024 05:38 PM