Private Bus : खासगी ट्रॅव्हल्सकडून गणेशभक्तांची सर्रास लूट! भरमसाठ भाडेवाढीने सर्वसामान्य बेहाल

Private Bus : खासगी ट्रॅव्हल्सकडून गणेशभक्तांची सर्रास लूट! भरमसाठ भाडेवाढीने सर्वसामान्य बेहाल

| Updated on: Aug 28, 2022 | 7:23 AM

दुप्पट भाडेवाढ करण्यात आल्यानं सर्वसामान्यांचा खिसा फाटलाय. ट्रॅव्हल्स कंपन्यांनी प्रवाशांची लुटमार थांबवावी, अशी मागणी केली जातेय. पण सामान्यांची ही केविलवाणी हाक नेमकी ऐकणार तरी कोण? खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानीविरोधात नेमकी दाद मागायची तरी कुणाकडे? असा प्रश्नही उपस्थित केला जातोय.

गणेशोत्सवात (Ganpati Festival) दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी गणेशभक्तांची खासगी ट्रॅवल्सकडून (Private travels) लूट सुरु आहे. नियमित तिकीट दरांच्या (Bus Ticket Rates) तुलनेत आता दुप्पट भाडेवाढ करण्यात आल्यानं सर्वसामान्यांचा खिसा फाटलाय. ट्रॅव्हल्स कंपन्यांनी प्रवाशांची लुटमार थांबवावी, अशी मागणी केली जातेय. पण सामान्यांची ही केविलवाणी हाक नेमकी ऐकणार तरी कोण? खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानीविरोधात नेमकी दाद मागायची तरी कुणाकडे? असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. रत्नागिरीचं नियमित भाडं 800 रुपये इतकं असतं, पण गणेशोत्सव काळात आता 1500 रुपये दर आकारला जातोय. सावंतवाडी, राजापूरसाठी 1200 रुपये असणारं नियमित भाडं आता गणेशोत्सवासाठी तब्बल 2 हजार रुपये इतकं करण्यात आलंय. गोव्यासाठी तर तब्बल 2500 रुपये करण्यात आलं. तर सांगलीसाठीही तिप्पट भाडेवाढ करण्यात आली आहे. पाचशे रुपयांवरुन आता थेट 1700 ते 2 हजार रुपये गणेशभक्तांना सांगलीत जाण्यासाठी मोजावे लागत आहेत. दादर परिसरात खासगी ट्रॅव्हल्स विरोधात निदर्शनही शनिवारी करण्यात आली होती.

Published on: Aug 28, 2022 07:21 AM