बाप्पाचं लग्न कधी पाहिलंय का? Ganpati चे लग्न लावण्याची Beed मधील अनोखी परंपरा

| Updated on: Feb 06, 2022 | 7:59 PM

400 वर्षा पूर्वी कोल्हापुरचे संत निरंजन स्वामी या गावात आले होते. त्यानीच या मंदिराची स्थापना केली असून भगवान श्री गणेशाचा विवाह लावण्याची प्रथा सुद्धा त्यांचीच आहे. निरंजन महाराजांची हीच परंपरा सातवी पिढी पुढे नेताना दिसत आहे.  

बीड : विवाह म्हटलं की भगवान श्री गणेशाच पूजन आलंच, मात्र त्याच श्री गणेशाच्या विवाहाची एक अनोखी परंपरा बीडमध्ये आजही कायम आहे. बीड जिल्ह्यातील नामलगाव येथे भगवान श्री गणेशाचा विवाह पार पाडला जातो. श्रीगणेशाचा  विवाह लावण्याची ही पद्धत पूर्ण भारतातून केवळ बीड मध्येच आहे. बीड पासून अवघ्या दहा किलो मीटर अंतरावर असलेल हे श्री गणेशाच अशापुरक गणेश मंदिर, सकाळचे पाच वाजले की अगदी शेकडो वर्हाडी भक्त विवाह सोहळ्याची वाट बघतात. नवरी रिद्धी आणि सिद्धी या दोघींना नटवीण्यात येते, मोठ्या उत्सावात या सोहळ्याची तयारी ही करण्यात येते. 400 वर्षा पूर्वी कोल्हापुरचे संत निरंजन स्वामी या गावात आले होते. त्यानीच या मंदिराची स्थापना केली असून भगवान श्री गणेशाचा विवाह लावण्याची प्रथा सुद्धा त्यांचीच आहे. निरंजन महाराजांची हीच परंपरा सातवी पिढी पुढे नेताना दिसत आहे.