VIDEO : Nashik | गटारी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर चिकन, मटण खरेदीसाठी नाशिककरांची गर्दी

VIDEO : Nashik | गटारी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर चिकन, मटण खरेदीसाठी नाशिककरांची गर्दी

| Updated on: Aug 08, 2021 | 12:45 PM

श्रावण महिन्यानंतर चिकन आणि अंड्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बाजारपेठेतील जाणकारांच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांमध्ये अंडी आणि चिकनच्या दरात 20 ते 25 टक्क्याची वाढ होऊ शकते. 

गटारी अमावस्याच्या मुहूर्तावर नाशिककरांनी  सकाळपासूनच मटण आणि चिकनच्या दुकानाबाहेर रांगा लावल्यात. गटारी अमावस्या झाल्यानंतर सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात अनेक जण मांसाहार वर्ज्य करतात. त्यामुळे आज मांसाहार प्रेमींनी सकाळपासूनच मटण आणि चिकन च्या दुकानाबाहेर रांगा लावल्यात. कोरोनामुळे निर्बंध असल्याने दुकानांच्या वेळा कमी आहेत. त्यामुळे लवकर मटण, चिकन मिळावं यासाठी लोक गर्दी करतायेत. अनेकांनी आखाड पार्टीचेही आयोजन गटारीच्या निमित्ताने करण्यात आले आहे. श्रावण महिन्यानंतर चिकन आणि अंड्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बाजारपेठेतील जाणकारांच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांमध्ये अंडी आणि चिकनच्या दरात 20 ते 25 टक्क्याची वाढ होऊ शकते.