गौतमी पाटीलने गाजवली प्रकाश सुर्वेंची दहीहंडी; ‘कचकच कांदा..’ गाण्यावर धरला जबरदस्त ठेका
दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने आज मागाठाणे येथे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मतदारसंघात गौतमी पाटील उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. दरवर्षी प्रकाश सुर्वे भव्य स्वरुपात दहीहंडी उत्सवाच आयोजन करत असतात. या उत्सवामध्ये 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला तब्बल 1 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
सबसे कातिल गौतमी पाटीलचे महाराष्ट्रात तुफान चाहते आहेत. अशातच दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने गौतमी पाटीलची मुंबईत हजेरी पाहायला मिळाली. मुंबई उपनगरातील दहीहंडी असलेल्या मागाठाणेमधील आमदार प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीत गौतमी पाटीलनं कचकच कांदा.. या गाण्यावर तुफान डान्स करत गोविंदा पथकांसह प्रेक्षकांचा उत्साह वाढवला. इतकंच नाहीतर गौतमी पाटीलने प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी सोहळ्यात जबरदस्त डान्स करत यावेळी पावणं जेवलात काय?, या गाण्यावर गोविंदांशी संवाद साधला. गौतमी पाटीलने आपलं नृत्य करताना भर मंचावर आयोजकांसमोरच शड्डू ठोकला आणि दंड बैठकाही मारल्याचे पाहायला मिळाले. गौतमी पाटीलच्या या जबरदस्त नृत्यानंतर उपस्थित असणाऱ्या गोविंदा पथकांनी देखील साद देत गौतमी पाटीला प्रतिसाद दिला. तर यावेळी गौतमी पाटील टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. ‘मी ऑल महाराष्ट्र शो करत असते. मुंबईची गोष्टच वेगळी आहे. लव यू मुंबईकर’ असं गौतमी पाटीलने म्हटलं.
![गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्... गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/boat-.jpg?w=280&ar=16:9)
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
![दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/ajit-pawar-4.jpg?w=280&ar=16:9)
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
![दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/amol-mitkari.jpg?w=280&ar=16:9)
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
!['आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन् 'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/09/amit-shah-3-2.jpg?w=280&ar=16:9)
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
![मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/chhagan-bhujbal-obc.jpg?w=280&ar=16:9)