सबसे कातिल गौतमी पाटील लग्नाच्या चर्चांवर थेट म्हणाली, ‘माझा लग्नाचा…’
VIDEO | गौतमी पाटील हिनं लग्नाच्या चर्चांना दिला पूर्णविराम, कधी करणार लग्न? काय दिली प्रतिक्रिया?
पंढरपूर : गौतमी पाटील तिच्या नृत्यामुळे आणि तिच्या दिलखेचक अदांमुळे नेहमीच चर्चेत असते. गौतमी पाटील हिचा कार्यक्रम कुठेही असो तिचा चाहता वर्ग आवर्जून तिच्या कार्यक्रमाला हजेरी लावतो. दिवसेंदिवस गौतमी पाटील हिची क्रेझ तरूणाईत वाढताना दिसत आहे. अशातच तिच्या लग्नाच्या चर्चाही सोशल मिडियावर गेल्या काही दिवसांपूर्वी होताना दिसत होत्या. मध्यंतरी गौतमी पाटील तिचा नवरा कसा असावा, यावर बोलली होती. त्यामुळे तिच्या लग्नाच्या चर्चेला तेव्हापासून सुरुवात झाली होती. मात्र या सुरू असलेल्या चर्चांना गौतमी पाटील हिनं पूर्णविराम दिल्याचं पाहायला मिळत आहे. पंढरपूर येथील सांगोला तालुक्यातील घेरडी गावात रासप नेत्याच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील कार्यक्रमास आली होती. यावेळी तिला तिच्या लग्नाबाबत प्रश्न विचारला असता ती म्हणाली, सध्या तरी माझा लग्नाचा कोणताही विचार नाही. जेव्हा असं काही ठरेल तेव्हा मी नक्की सांगेन. असं म्हणत गौतमी पाटील हिने आपल्या लग्नाबद्दल सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.