‘सबसे कातिल गौतमी पाटील’ हिच्यावर थेट बार्शीत गुन्हा दाखल, पण नेमकं काय घडलं?
VIDEO | गौतमी पाटील हिच्यावर थेट बार्शीत गुन्हा दाखल, केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना काय केला दावा?
मुंबई : सबसे कातिल गौतमी पाटील (Gautami Patil) अशी ओळख असणारी प्रसिद्ध नृत्यंगना सध्या चर्चेत आहे. आपल्या दिलखेचक अदांनी सर्वांना भुरळ पाडणाऱ्या गौतमीच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बार्शी पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पहिल्यांदाच गौतमीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. इतकंच नाही तर याच प्रकरणात सोलापुरात तिचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकावरही गुन्हा दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र या सर्व प्रकारावर गौतमी पाटील हिने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मला या गोष्टीची अजूनही माहिती नाही. मी अजून याबाबत कोणतीही माहिती घेतलेली नाही. मी याबाबतचा व्हिडीओ दुपारी पाहिला. मी याबाबत पूर्ण माहिती काढून सविस्तर माहिती देईन. आता सध्या तरी मी याबाबत काहीच बोलू शकत नाही, असे गौतमीने म्हटले.
तर कार्यक्रम ७ वाजता होता आणि येण्यास उशीर केल्याचा आरोपही गौतमीवर करण्यात आला. यावर बोलताना गौतमी पाटील म्हणाली, “मी वेळेत पोहोचले होते. आजपर्यंत असं घडलं नाहीय की, लेट गेले आणि उशिराने कार्यक्रम सुरु झालाय. मी वेळेत पोहोचले होते. मला दहा वाजेपर्यंत परवानगी असते. माझ्या कार्यक्रमाला पोलीस असतात. त्यांची साथ असते. त्यामुळे त्यांचं म्हणणं मला ऐकावं लागणार. ते मला म्हटले दहाला कार्यक्रम बंद करा. तर मी दहा वाजता कार्यक्रम बंद करणारच आहे. याबाबत मी सविस्तर माहिती घेऊन आपल्याशी बोलेन.