Gautami Patil : ठाण्यात येऊन सबसे कातील गौतमी पाटील म्हणाली,  ठाणेकरांचं प्रेम म्हणजे...

Gautami Patil : ठाण्यात येऊन सबसे कातील गौतमी पाटील म्हणाली, ठाणेकरांचं प्रेम म्हणजे…

| Updated on: Nov 12, 2023 | 1:57 PM

Diwali Pahat 2023 In Thane: दिवाळी पहाट निमित्त शिंदे गटाच्या शिवसेनेतील माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात गौतमी पाटीलनं सादर केली लावणी, या कार्यक्रमातील गौतमी पाटील हिचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होतायंत, ठाणेकरांकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल गौतमी पाटील म्हणाली...

ठाणे, १२ नोव्हेंबर २०२३ | तर ठाण्यातील तलाव पाळी येथील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात सबसे कातील, गौतमी पाटील हिच्या खास शोचं आयोजन करण्यात आले होते. दिवाळी पहाट निमित्त शिंदे गटाच्या शिवसेनेतील माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात गौतमी पाटील यांनी ठाण्यात लावणी सादर करत तरुणाईला मंत्र मुग्ध केले. ठाण्यातील चिंतामणी चौकात तरुणाई जल्लोष करताना दिसली. सकाळपासून तरुणाईने बेधुंदपणे डीजेच्या तालावर जल्लोष केला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना गौतमी पाटील म्हणाली, मी पहिल्यांदाच ठाण्यात आली. मला ठाणेकरांचं प्रेम एक नंबर वाटलं. मी मुंबईत नेहमी येत असते मला मुंबईतील जनता मला खूप आवडतं. मला नेहमीचं मुंबईतील मुंबईकरांचं प्रेम मिळत असतं. आज लक्ष्मीपूजन असून आज सकाळी पाच वाजेपासूनच लोकं येऊन थांबली होती. त्यांचं माझ्यावर असणारं प्रेम पाहून खरंच खूप भारी वाटतंय.तर यावेळी गौतमीने सर्वांना, प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्यात.

Published on: Nov 12, 2023 01:57 PM