असं काय घडलं की, ‘सबसे कातिल गौतमी पाटील’ हिच्या कार्यक्रमाला कुणीच नाही आलं?
VIDEO | गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला लोकांनी का फिरवली पाठ? कुठं पब्लिकपेक्षा रिकाम्या खुर्च्याच दिसल्या?
नाशिक : गौतमी पाटील आणि गर्दी हे समीकरण ठरलेलंय. गौतमी जिथे जाते तिथे गर्दी होतेच होते. गौतमीचा डान्स म्हटला तर टांगा पलटी घोडे फरार अशी प्रेक्षकांची गर्दी असते. बऱ्याचदा गौतमीच्या कार्यक्रमात बसायला जागा नसते म्हणून कुणी झाडावर जाऊन बसतो तर कुणी घराच्या छतावर जाऊन गौतमीच्या दिलखेचक अदा न्याहाळताना दिसतो. गौतमीच्या कार्यक्रमात इतकी गर्दी असते की पोलिसांना जमावावर लाठीमार करावा लागतो. पण नाशिकमध्ये काहिसं वेगळं चित्र दिसलं. कार्यक्रम सुरू झाला तरी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमातील खुर्च्या रिकाम्याच होत्या. पब्लिक सबसे कातिल गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाकडे फिरकलीच नाही. पहिल्यांदाच असं घडलं की तिच्या कार्यक्रमाला लोकांना पाठ फिरवली. मात्र नेमकं काय घडलं नाशिकमध्ये? नाशिकच्या ठक्कर डोम येथे प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा काल लावणीचा कार्यक्रम पार पडला. नवनिर्माण सेवाभावी संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. सगळीकडे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला गर्दी असते. मात्र नाशिकमध्ये तसं दिसलं नाही. कार्यक्रमाचे तिकीट दर जास्त असल्याचे कारण यामागे सांगितले जात आहे. गौतमीच्या कार्यक्रमाला 300 रुपयांपासून ते 2 हजार रुपयांपर्यंतचे तिकीट लावण्यात आले होते. एवढे महागडे तिकीट परवडत नसल्याने चाहते नाराज होते. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी कुणीच नव्हतं. त्यामुळे गर्दी असल्याने आणि रिकाम्या खुर्च्यांच जास्त असल्याने गौतमीला तिचा नाशिकचा कार्यक्रम उवरता घ्यावा लागला.