गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात तुफान राडा अन् अब्दुल सत्तार यांची शिवराळ भाषा, ऐ पोलीसवाले...

गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात तुफान राडा अन् अब्दुल सत्तार यांची शिवराळ भाषा, ऐ पोलीसवाले…

| Updated on: Jan 05, 2024 | 10:41 AM

अब्दुल सत्तार यांनी वापरलेले काही शब्द हे मराठा भाषेच्या उत्पत्तीपासून तुम्ही आजवर ऐकले नसतील असे शब्द त्यांनी काढले. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसाचं निमित्त होतं. या दिवशी त्यांनी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच तरूणांनी मोठी गर्दी केली. गौतमी पाटीलची एन्ट्री झाली आणि...

मुंबई, ५ जानेवारी २०२४ : राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांची भाषा ऐकून कोणत्याही सभ्य माणसाला लाज येईल, असे शब्द अब्दुल सत्तार यांनी वर्तवले आहे. यामुळे विरोधक आक्रमक झालेत तर सत्ताधारी आमदारांनीही यासंदर्भात नाराजी वर्तविली आहे. तर नेहमीप्रमाणे शिवराळ भाषा वापरल्यानंतर सत्तार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. अब्दुल सत्तार यांनी वापरलेले काही शब्द हे मराठा भाषेच्या उत्पत्तीपासून तुम्ही आजवर ऐकले नसतील असे शब्द त्यांनी काढले. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसाचं निमित्त होतं. या दिवशी त्यांनी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच तरूणांनी मोठी गर्दी केली. गौतमी पाटीलची एन्ट्री झाली आणि दाटीवाटीत बसलेल्या तरूणांमध्ये गोंधळ सुरू झाला. यावेळी काहींनी आरडा-ओरड केली. गौतमीच्या सखा सजणा या गाण्याची दोन कडवी होत नाही तोपर्यंत सुरू झालेल्या गोंधळादरम्यान सत्तार यांनी माईकचा ताबा घेतला आणि गौतमीच्या सरकार तुम्ही मार्केट केलं जाम हे गाणं होण्यापूर्वीच सत्तारांच्या शिव्यांनी मार्केट जाम केल्याचे पाहायला मिळाले. बघा स्पेशल रिपोर्ट 

Published on: Jan 05, 2024 10:39 AM