गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा तरुणांची हुल्लडबाजी, पोलिसांनी केला लाठीचार्ज अन्...

गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा तरुणांची हुल्लडबाजी, पोलिसांनी केला लाठीचार्ज अन्…

| Updated on: Feb 24, 2023 | 9:52 AM

VIDEO | गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात पुन्हा गोंधल आणि हुल्लडबाजी, पोलिसांकडून तरूणांवर लाठीचार्ज, कुठं घडला प्रकार?

अहमदनगर : प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा गैतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. अहमदनगर येथे गौतमी पाटील हिचा नृत्याचा कार्यक्रम होता. गौतमी पाटील हिचा डान्स पाहण्यासाठी अनेकांची गर्दी जमली. यावेळी गौतमीवर मोठ्या प्रमाणात नोटांचा वर्षाव करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. कार्यक्रमात गर्दी असल्याने हुल्लडबाजीचा प्रकारही पाहायला मिळाला. यामुळे पोलिसांनी अतिउत्साही तरूणांवर लाठीचार्जही केला. मात्र तरीही ही हुल्लडबाजी काही केल्या थांबेना म्हणून गौतमी पाटील हिला आपला कार्यक्रम गुंडाळावा लागला. सध्या गौतमी पाटील हिचा डान्स शो आणि कार्यक्रमात होणारा राडा हे एक गणितंच बनलं आहे. राहाता येथील गौतमी पाटील हिच्या‌ कार्यक्रमात तरुणांनी हुल्लडबाजी केल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. गौतमीची लावणी सुरू असताना काही तरुणांनी तिच्यावर नोटांची उधळण केल्याने हा कार्यक्रम थांबवावा लागला. गर्दी नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा कार्यक्रम सुरू झाला. मात्र तरीही हुल्लडबाजी सुरूच राहिल्याने बंदोबस्तात गौतमीला बाहेर काढावे लागले.